Testimonials

 

“प्रात्यक्षिकामधून प्रशिक्षण मिळाले त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळाला.”

श्री. योगेश काळे

शिवनेरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्स, बोरी, पुणे.

“करोना महामारीमध्ये व्यवसायचे काय होणार अशी चिंता असताना विज्ञान आश्रमाने माझ्या व्यवसायासाठी ऑनलाइन शॉप सुरू करून दिले. त्यामुळे माझ्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे सोपे झाले. त्या मधून मी ऑनलाइन ऑर्डर घेऊ शकले.”

सौ. सारिका जगताप

रुचि फुड्स, शिरवळ, पुणे

“मी तयार केलेली बिर्याणी घरी सर्वांना आवडायची माझ्या याच कौशल्याचा उपयोग करून मी माझा व्यवसाय कसा सुरू करू शकते आणि त्यासाठी आवश्यक व महत्वपूर्ण संकल्पना खूप सोप्या करून सांगितल्या आणि व्यवसायात वापरायला शिकले. आता माझा बिर्याणी व बिर्याणी तयार मसाला याचा व्यवसाय आहे.”

सौ.स्वाती गवंडी

हॉट-स्पॉट बिर्याणी हाऊस तडसर, सांगली

“6 हजार पक्षांचा कुकुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च येणार होता विज्ञान आश्रम मुळे मला कळल की मी भाड्याने सुद्धा पौल्ट्री घेऊ शकतो. त्यांच्या मदतीने मला ती मिळाली आणि मी पहिल्याच बॅच मध्ये 1 लाख 20 हजार रु नफा कमविला. मी Calculated Risk कशी घ्यायची ते शिकलो”

श्री. सागर नलावडे

सृष्टि पौल्ट्री फार्म, लाखणगाव,पुणे

“मी कुकुटपालन व्यवसायाला सुरुवात केली आणि अचानक पक्षांची मर सुरू झाली. अतिशय योग्य वेळी विज्ञान आश्रम विषयी माहिती मिळाली संपर्क केला तज्ञांच्या माहिती प्रमाणे उपाययोजना केली आणि संकटावर मात केली. तेंव्हा पासून आजपर्यंत खाद्यव्यवस्थापन, लसीकरण, विक्री अशा सर्वच बाबींचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे”

श्री. आदित्य बोऱ्हाडे

आदित्य पौल्ट्री फार्म, शिरूर, पुणे

“मला माझ्या कंपनीचा विस्तार करताना Business Plan, मार्केटिंग, नवीन प्रॉडक्ट तयार करून टेस्ट करणे अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे माझ्या व्यवसायात वाढ झाली.”

श्री. शुभम येडे

यमाई फूड इंडस्ट्रीज प्रा. लि, कवठे यमाई, पुणे

“विज्ञान आश्रमामुळे मला आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची शासकीय योजना मंजूर झाली व बँक लोन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी मदत झाली”

श्री. निखिल पडवळ

गावरान अग्रो, महाळुंगे पडवळ, पुणे

“मला FSSAI लायसन्स, उद्यम आधार व पॅन कार्ड ही व्यवसायासाठी लागणारे महत्वपूर्ण नोंदणी व लायसन्स काढायचे होते बाहेर त्याचा खर्च जास्त सांगत होते, विज्ञान आश्रम मध्ये फक्त त्या कागदपत्रांना लागत असलेल्या शासकीय फी घेऊनच मला ते काढून मिळाले.”

कु. प्रियंका भिवरे

धन्वीका फुड्स, शिक्रापुर पुणे

“आपल्या सोबत कोणी भक्कम सपोर्ट आहे हे कळाल की आपण वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याचे धाडस करत जातो, विज्ञान आश्रम हा माझा भक्कम सपोर्ट आहे. वैयक्तिक मार्गदर्शन माला खूप महत्वाचे वाटते ते माला मिळाले.”

श्री. अक्षय काजरेकर,

अक्षय फुड्स, कोथरूड, पुणे

“मला शेळीपालन व्यवसाय करायचा होता पण सोप्या भाषेत माहिती व on field सपोर्ट कोण देईल हे मी शोधत होता. विज्ञान आश्रम ने तो मला दिला आणि माझा व्यवसाय सुरू झाला.”

श्री. अमोल पानसरे,

करांजवणे, शिरूर, पुणे.

Supported By

स्टार्टअप सारथीची मदत कशी मिळवायची?

कृपया आम्हाला startupsarathi.va@gmail.com वर ‘स्टार्टअप सारथी’ या विषयासह ई-मेल लिहा किंवा पुढील लिंक मध्ये आपली माहिती भरा

×